औरंगाबाद (प्रतिनिधी) – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मसिआ) आणि एएसआर इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको एन-दोन येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर घेण्यात येणाऱ्या एएसआर-मसिआ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२६)इन्ड्रेस हाऊजर, सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्स, मसिआ ए आणि रिऑन वॉरियर मसिआ बी या टिमने दणदणीत विजय मिळवला.
स्पर्धेत शनिवारी पहिल्या समान्यात इन्ड्रेस हाऊसर विरुध्द मे विश्व समृद्धी इंडस्ट्रीज आयटी यांच्या लढत झाली. पहिल्यांद फलंदाजी करताना इन्ड्रेस हाऊजरने १५ षटकात ९ बाद १०१ धाव केल्या यात गणेश कुमार यांच्या २०, जयेश पोकळे यांच्या २२ आणि साईकुमार खेडकर यांनी १८ धावा केल्या. याचा पाठलाग करताना विश्व समृध्दी आयटीने १३ षटकात ६३ धावावर इन्ड्रेज हाऊजरने आयटीला रोखले. या समान्यात आशिष ने ३ विकेट तर नितीन राज यांनी २ गडी बाद केले. विश्व समृध्दीकडून विमल यांनी २८ धावा केल्या. यात जयेश पोकळे मॅन ऑफ द मॅच ठरले. दुसरा सामना हा सुपरब पॉलीपॅक स्ट्रायकर्स मसिआ (ए) विरुध्द सन्मान इंडस्ट्रीज एमआयडीसी यांच्यात झाला. यात पहिल्यांदा करीत मसिआ ए टिमने १५ षटकात ६ बाद १७४ धावाचे लक्ष एमआयडीसी समोर ठेवले. यात धर्मेंद पटेल यांनी ५८, हितेश पटेल ६० आणि रोहण शहा यांनी २४ धावा काढल्या. तर प्रतिउत्तरात एमआयडीसीने १५ षटकात तीन बाद केवळ ८६ धाव केल्या. त्यात राजेश ठाकरे यांनी सर्वाधिक ३१ धावा केल्या. या समान्यात हितेश पटेल मॅन ऑफ दी मॅच ठरले.
तिसरा समाना हा दिग्विजय मार्वल्स जीएसटी विरूध्द रेऑन वॉरियर मासिआ बी यांच्यात झाली. यात जीएसटी टीमने १५ षटकात सात बाद १०४ धावा केल्या. यात संतोष मेहेर यांनी २७ धावा केल्या. रेयॉन वारीयर्स कडून तर मंगेश निटुरकर यांनी तीन गडी बाद केले. तर रोहन राठोड आमि नितीन कडावकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.याच्या प्रतिउत्तरात रेयॉन वारीयर्स टीमने पाच विकेट आणि तीन चेंडू राखत जीएसटीवर दणदणीत विजय मिळवला. जीएसटीचे सहआयुक्त जी श्रीकांत यांनी या समन्यात चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात रोहण -२७, केतन ३३, संदीप भंडारी यांनी १८ धावा केल्या. या समान्यात रोहन राठोड मॅन ऑफ द मॅच राहिला. राज्यकर जीएसटीचे सहआयुक्त जी श्रीकांत, उद्योजक अजित मुळे, बालाजी शिंदे, श्रीराम शिंदे, मनिष अग्रवाल यांच्या हस्ते रोहन राठोड यांनी मॅन ऑफ द मॅच खिताब देण्यात आले. समान्यांचे पंच म्हणून अमोल अभ्यांकर, बाळासाहेब चौधरी, विद्याधर पांडे, स्कोरर म्हणून विवेक घुगे व कॉमेंटेटर म्हणून डॉ. विवेक घोलप यांनी काम पाहिले.