अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान

अलिबाग— तीस वर्षांपुर्वी मी अलिबागला आलो. इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते, ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ते कणकेश्व्र फाटा येथे सुशोभिकरण सोहळ्यात बोलत होते.

 

अलिबाग मांडवा रस्त्यावरील कणकेश्व्र फाटा परीसराचे सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थित होते. समिरा उद्य्ोग समुहाकडून या वाहतुक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आले. या फाटय़ाला चँम्पियन ऑफ चँम्पियन रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग मोठय़ा संख्येनी उपस्थित होते.

भारतीय संघात खेळत असतांना मी १९९२ मध्ये मी अलिबागला आलो. आवास सासवणे परीसरात जागा घेतली, तिथेच स्थायिक झालो. या तीस वर्षांत मला अलिबागने जी शातंता दिली. प्रेम दिले ते जगात कुठेच नाही मिळाले असे उद्गार शास्त्री यांनी काढले.

जिल्ह्याचे क्रिडा संकुल अलिबाग येथे विकसीत केले आहे. तिथे खेळाडूंना अधिक सोयी सुविधा देण्याचा प्रय केला जात आहे. यातून चांगले खेळाडू तयार व्हावे हा उद्देश आहे असे मत आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

जेव्हा टीम चांगले काम करते तेव्हा लोकांचे प्रेम मिळते. पण जेव्हा टिम हरते तर लोक रागही व्यक्त करतात. अशा ताण तणाव निराशा दूर करण्याचे काम अलिबाग करते. त्यामुळे अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलिबाग मध्ये चांगले खेळाडू आहेत. जे आयपीएल, रणजीमध्ये तसेच देशाच्या संघातही स्थान मिळवू शकतात. शकतात. पण त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहीजे, संधी मिळायला पाहीजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

You might also like

Comments are closed.