राज्यस्तरीय महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षा , प्रगती , कांचन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

सोलापूर। सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात आकांक्षा नित्तूरे, प्रगती सोलणकर, कांचन चौगुले या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, सोलापूर येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत नागपूरच्या तनया चौधरीचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या मानांकित सोलापूरच्या प्रगती सोलनकर हिने मुंबई उपनगराच्या अलिशा देवगांवकरला 4-1, 4-1 असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित सोलापूरच्या ज्योत्स्ना मदनेने पुण्याच्या तन्वी तावडेचे आव्हान 4-0, 4-0 असे संपुष्टात आणले. सोलापूरच्या चौथ्या मानांकित कांचन चौगुले हिने नागपूरच्या कल्याणी सोमेवारचा 4-1, 4-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

निकाल: महिला: उपांत्यपूर्व फेरी:
आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)[1] वि.वि.तनया चौधरी(नागपूर)4-0, 4-0;
ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[3] वि.वि.तन्वी तावडे(पुणे)4-0, 4-0;
कांचन चौगुले(सोलापूर)[4]वि.वि.कल्याणी सोमेवार(नागपूर)4-1, 4-0;
प्रगती सोलनकर(सोलापूर)[2] वि.वि.अलिशा देवगांवकर(मुंबई उपनगर)4-1, 4-1.

याआधी स्पर्धेचे उदघाटन अखिल भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस रौप्य पदक विजेत्या महिला टेनिस पटू संध्याराणी बंडगर आणि क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया, माया खंडी , सुनंदा पवार, मनीषा गायकवाड , मोनिका आळंद आदी मान्यवर उपस्थित होते.

 

You might also like

Comments are closed.