रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला ६२ धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे.प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघबांधणी करण्यात आलेला भारतीय संघ शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन लढतींच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत धरमशाला येथे दुसरा ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला ६२ धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे.
इशान, श्रेयसची दावेदारी
विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत धावांसाठी
संघ-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमा
श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), पथुम निसंका, चरिथ असलंका, दिनेश चंडिमल, कुशल मेंडिस, दानुष्का गुणथिलका, कमिल मिशारा, जनिथ लियांगे, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नाडो, शिरान फर्नाडो, महीष थिक्षणा, प्रवीण जयविक्रमा, अशियान डॅनिएल, जेफ्री वॉडर्से
वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स –
झगडणाऱ्या इशान किशनने ८९ धावांची खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरनेही वेगवान अर्धशतकासाह विश्वचषकाच्या दृष्टीने संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.