लेवीसच्या फटकेबाजी नंतर राजस्थानचा डाव गडगडला.

स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये एक सामना खेळायला जाणार आहे. तर यामध्ये राजस्थान समोर रौयल चॅलेंजर बेंगलोर चे आव्हान असणार आहे. तर यामध्ये बेंगलोर ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चांगल्या सुरुवातीनंतर ही राजस्थानचा डाव गडगडला. एक वेळ 77 वर 0 असताना राजस्थान फक्त 149 धावांपर्यंतच मजल मारू शकला. मागच्या सामन्यांमध्ये हॅट्रीक घेणाऱ्या हर्षल पटेलने या सामन्यातही एका षटकात तीन बळी घेतले.

आता आर सी बी समोर 150 धावांचे सोपे आव्हान असणार आहे.नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानला सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. ईवान लेविस व यशस्वी जयस्वाल ने संघाला आठ षटकात 77 धावांची भागीदारी करून दिली.

मात्र नंतर एकही फलंदाज साजेशी खेळी करू शकलं नसल्यामुळे राजस्थान फक्त 149 धावांपर्यंतच मजल मारू शकला. मध्यम फडीत राजस्थान ने 40 धावांत 5 गडी गमावले. राजस्थान कडून लेवीज ने सर्वाधिक 58 धावा केल्या, यशस्वी जयस्वाल नेही 31 धावांचे योगदान दिले. तर आरसीबी कडून हर्षल पटेल ने तीन तर चहल व शाहबाजणे प्रत्येकी दोन गडी बाद केले. आरसीबी हा सामना जिंकून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित करण्याचे निर्धार आरसीबीचा असेल.

You might also like

Comments are closed.