• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, September 29, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

by pravin
September 28, 2026
in अन्य खेळ, खेळ ( वैयक्तिक), सायकलिंग, स्पर्धा
Reading Time: 1 min read
गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

श्री गणेशोत्सव उत्सवानिमित्त आयोजित ‘गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंज’चे पारितोषिक वितरण गुरुवारी सकाळी करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा गणेशोत्सव महासंघ, २४ अव्हेंजर फाऊंडेशन आणि तेजस्विनी सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी २४ अव्हेंजर फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निनाद खोचे, नेहाली खोचे, सायकलिंग व स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष भिकन आंबे आणि नीता गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. चॅलेंजमध्ये ५० सायकलपटूंनी सहभाग घेतला.

गणेशोत्सव काळात सायकलपटूंनी शहरातील विविध गणेशस्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. यामध्ये वरद गणेश, राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती, सन्मित्र मंदिर, देशमुखनगर, शिवाजीनगर, पन्नालालनगर गणेश मंदिर, थत्ते हौद येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर, बेगमपुरा रोड, जयसिंगपुरा, बेगमपुरा, छावणीतील सुभाषपेठ गणपती आणि वंदेमातरम सभागृहासमोरील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर यांचा समावेश होता.

तसेच एन-६ येथील सिद्धिविनायक, सह्याद्रीनगर, अरुणोदय कॉलनी, दलालवाडीतील काथार समाज गणेश, एन-१ येथील भक्ती गणेश मंदिर, काळा गणपती, विद्यापीठातील तळ्यातील गणेश, गुरुगोबिंदसिंगपुरा येथील राममंदिरातील गणपती, बायजीपुरा येथील विघ्नहर्ता गणपती आणि प्रबोधनकार ठाकरेनगर येथील गणपतीचेही सायकलपटूंनी दर्शन घेतले.

Tags: २४ अव्हेंजर फाऊंडेशनगणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजगणेशोत्सवछत्रपती संभाजीनगरजिल्हा गणेशोत्सव महासंघतेजस्विनी सायकलिंग क्लबसायकलिंग
ShareTweetSend
Next Post
एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.