• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, August 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

20-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर ; नक्की वाचा

by pravin
January 22, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट मोहिमेला प्रारंभ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर २३ ऑक्टोबरला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढतीने होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले.

गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये प्रथमच पाकिस्तानकडून हरला. अव्वल-१२ फेरीमधील भारताचा दुसरा सामना २७ ऑक्टोबरला अ-गटातून उपविजेत्या ठरलेल्या संघाशी होणार आहे. मग भारत ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी, तर २ नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करणार आहे. ६ नोव्हेंबरला भारताचा अव्वल-१२ फेरीमधील अखेरचा सामना ब-गटातील विजेत्याशी होईल.

दोन गटांचा समावेश असललेल्या अव्वल-१२ फेरीस २२ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीने प्रारंभ होईल. याच दोन सघांमध्ये गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. १ नोव्हेंबरला न्यूझीलंडचा संघ इंग्लंडशी लढत देईल. २०२१मध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवले होते.

भारताचे सामने

२३ ऑक्टोबर वि. पाकिस्तान दु. १.३० वा.

२७ ऑक्टोबर वि. अ-२ दु. १२.३० वा.

३० ऑक्टोबर वि. दक्षिण आफ्रिका दु. ४.३० वा.

२ नोव्हेंबर वि. बांगलादेश दु. १.३० वा.

६ नोव्हेंबर वि. ब-१ दु. १.३० वा.

अव्वल -१२ फेरी

’गट-१ : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान, अ-१, ब-२

गट-२ : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, ब-१, अ-२

पहिली फेरी

अ-गट : श्रीलंका, नामिबिया, पात्र-१, पात्र-२

ब-गट : वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, पात्र-३, पात्र-४

Tags: competitionICCindia vs pakistanscheduleworld cup2022
ShareTweetSend
Next Post

सिंधू, मिथुन उपांत्य फेरीत; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

ताज्या बातम्या

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

ट्रीसा-गायत्रीची ऐतिहासिक झेप; चीनच्या चौथ्या मानांकित जोडीला धक्का, भारताचे पदक निश्चित!

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी अजितदादांची परंपरा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.