• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नंबर वन महिला टेनिसपटू एश्ले बार्टी झाली ‘एंगेज

by pravin
November 25, 2021
in टेबल टेनिस, आंतरराष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जागतिक टेनिसमधील ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला टेनिस खेळाडू एश्ले बार्टीने एक मोठी घोषणा केली आहे. बार्टी जागतिक टेनिसमधील पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे. एश्ले बार्टीने तिचे लग्न ठरल्याची माहिती दिली आणि साखरपुड्याची अंगठी हातात घातलेला फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही माहिती दिली आहे. बार्टीने तिच्या होणार्या पतीसोबत साखरपूडा झाल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याच्यासोबतचा एख खास फोटो शेअर केला आहे.

एश्ले बार्टीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर एक खास पोस्ट करत लवरच ती लग्नबंधनात अडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २५ वर्षीय बार्टी आता  लवकरच तिच्या जवळच्या मित्रासोबत लग्न करणार आहे. तिच्या या जवळच्या मित्राचे नाव गॅरी किसीक आहे आणि मागच्या बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. तत्पूर्वी तिने इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. फोटोत ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत दिसत असून, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “भविष्यात होणारा पती”

डब्लयूटीए क्रमवारीत बार्टी सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा ती क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असताना वर्षाचा शेवट करेल. तिने या सत्रात विंबल्डनसह एकूण पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला परतण्यापूर्वी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर आता ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेची तयारी करत आहे. तिने पुढच्या सत्राच्या आधी स्वतःता ताजेतवाने केले आहे. याबाबत ती म्हणली आहे की, तीन महिन्यांचा ब्रेक तिच्यासाठी फायदेशीर राहीला.

https://www.instagram.com/p/CWnDVdFBDJ_/?utm_source=ig_web_button_share_sheet

तत्पूर्वी विंबल्डन टेनिस स्पर्धेनंतर बार्टीने  टीकाकारांना तिच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ती यावेळी म्हणाली होती की, “अनेक लोक मी क्रमांक एकची खेळाडू असन्याबाबत शंका उपस्थित करत आहेत, अशात मला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि विंबल्डनमधील विजयाने मी ते करून दाखवले.”

Tags: एंगेजएश्ले बार्टीटेनिसपटू
ShareTweetSend
Next Post

विनू मंकड यांच्या मुलाची बीसीसीआयला विनंती

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.