जालना(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व निकाळजे ट्रान्स रोडवेज यांच्या सहकार्याने दिनांक 27 ते 28 ऑक्टोबर 2021 दरम्यान सातारा मेगा फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड शेंद्रे कारखान्याजवळ वळसे फाटा, सातारा कोल्हापूर रोड, सातारा येथे होणाऱ्या 23 वी वरिष्ठ महिला व 24 वी वरिष्ठ ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे जिल्ह्याचा संघ निवडीसाठी शनिवार , दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता शहरातील भक्त नगर रेवगाव रोड वरील गुरु रामचंद्र उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत वजने घेऊन दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
स्पर्धेला येताना पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, व ओरिजिनल आधार कार्ड सोबत आणावे. सदरील स्पर्धा खालील वजन गटात खेळली जाईल.
ग्रीको रोमन – 55 किलो, 60 किलो, 63 किलो, 67 किलो, 72 किलो, 77 किलो, 82 किलो, 87 किलो, 97 किलो, 130 किलो पर्यंत
महिला – 50 किलो, 53 किलो, 55 किलो, 57 किलो, 59 किलो, 62 किलो , 65 किलो, 68 किलो, 72 किलो व 76 पर्यंत
सदरील निवड चाचणी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशन उस्ताद भगत, सरचिटणीस प्राचार्य डॉ दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, प्रा डॉ भिकूलाल सले, प्रा डॉ शाम काबुलीवाले, श्री गोपाल काबलीये आदी पदाधिकाऱ्यांनी केले.