हिटमॅन शर्मा धोनीला मागे टाकत बनला ‘सिक्सर किंग’

चेन्नई : आयपीएलमध्ये  झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग तिसरा पराभव झाला असुन ते गुणतालीकेत सर्वात शेवटच्या म्हणजे आठव्य स्थानी आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये आता २१७ षटकार असून त्याने सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीच्या नावावर २१६ षटकार तर विराट कोहलीच्या नावावर २०१ षटकार आहेत. सुरेश रैनाने १९८ षटकार लगावले आहे.

आयपीएलमधील सर्वच खेळाडूंचा विचार केला तर सर्वाधीक षटकार लगावणाऱ्या ख्रिस गेलच्या तुलनेत मात्र रोहित बराच मागे आहे. ख्रीस गेलने तब्बल ३५१ षटकार लगावले आहेत. तर एबी डी विलीयर्सने २३७. त्यानंतर रोहित शर्माचे नाव येते.

आयपीएलमध्ये २०० च्या वर षटकार

  • ३५१ – ख्रीस गेल
  • २३७ -एबी डीविलीयर्स
  • २१७ – रोहित शर्मा
  • २१६ – एम.एस.धोनी
  • २०१ – विराट कोहली
You might also like

Comments are closed.