छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालय चे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.रणजीत पवार यांची FIG च्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स Level 2 कोर्स हॉंगकॉंग चीन येथे दिनांक ०३ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कोर्स करिता निवड झाली असून ही निवड जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांचा वतीने करण्यात आली असून ही संधी त्यांना त्यांच्या मागील कामगिरी पाहता देण्यात आली असून त्यांना म.शि.प्र. सरचिटणीस मा.आमदार सतीश भाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रदीप भाऊ चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी. पवार सर तसेच जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे,सचिव डॉ.मकरंद जोशी, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी ,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग उपसंचालक नितीन जैस्वाल, सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर,जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ. शत्रुंज कोटे, डॉ.विशाल देशपांडे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे यांनी डॉ.रणजीत पवार यांना कोर्स करिता शुभेच्छा दिल्या.