छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी) : खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक आणि स्पोर्टस् ॲथारटी ऑफ इंडिया (साई) तर्फे कार्यान्वित पहिली “अस्मिता वुमन्स लिग ज्यूदो स्पर्धा” आपल्या शहरात 29 ऑक्टोबर रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
देशभरातील 25 शहरात आणि महाराष्ट्रातील पाच शहरांपैकी रत्नागिरी, नाशिक, गोंदिया आणि धुळे यांसह छ. संभाजीनगर हा एक जिल्हा निवडला गेला असून या स्पर्धा बालगट , कुमार गट, ज्यनिअर गट आणि वरिष्ठ गट या चार श्रेणीत आयोजित होणार आहेत.
भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातर्फे अंशतः अनुदानित या स्पर्धेसाठी आमदार अतुलजी सावे यांच्या आमदार निधीतुन आणि शहरातील नामवंत व्यवसायीकांकडून आर्थिक सहकार्य प्राप्त होत आहे.
या स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय अर्थ मंत्री डॉ.भागवत कराड यांचे हस्ते होणार आहे.जिल्ह्यातील 130 महिला खेळाडूंनी स्पर्धेसाठी नांव नोंदणी केली असून “बंदी में हैं दम” हा पुरस्कार कॅडेट प्रकारातील दोन खेळाडूंना मिळेल.
जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन साई चे सहसंचालक नितीन जयस्वाल आणि. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजीत मुळे आणि सचिव अतुल बामनोदकर यांनी सांगितले.