युथ नॅशनल कुस्ती स्पर्धा पै.अमोल भोसले आणि संतोष पवार ला सुवर्ण पदक पटकावले

गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार व विजय रॅली

जालना(प्रतिनिधी)-. राजस्थान मधील जयपूर येथे ६ सप्टेंबर रोजीआयोजित युथ गेम नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ मध्ये कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी च्या दोन कुस्ती पैलवनांनी झालेल्या स्पर्धेत विजयी होऊन सुवर्ण पदकांचा मान मिळवला आहे.
यात चिंचोली येथील पैलवान अमोल नामदेव भोसले यांनी जेष्ठांच्या ७० किलो वजनी गटाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर सुवर्णपदक महाराष्ट्रासाठी पटकावले असून सोबत असलेले मित्र पै.संतोष बाळा पवार यांनी १९ वर्षा खालील गटांमध्ये प्रथम क्रमांकावर सुवर्णपदक पटकावले आहे
परराज्यात जाऊन आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्ण पदकाचे ध्येय गाठून विजय मिळवल्यामुळे या वेळी गावकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला व या दोन्ही पैलवानांना खांद्यावर घेऊन चिंचोली लि. गावातून विजयी रॅली काढण्यात आली होती या वेळी दोन्ही पैलवानांचे कौतुकास्पद कार्य असून यांनी आमच्या गावासहित राज्याचे नाव परराज्यात जाऊन आपल्या मेहनतीने लौकिक केले व सुवर्णपदकाचा मान मिळवला असून यांचा आम्हला सार्थ अभिमान वाटतो असे उत्साही नागरिकांनी बोलतांना सांगितले आहे.

You might also like

Comments are closed.