जालना (प्रतिनिधी)- सिल्लोड तालुक्यातील हळदा गाव येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऋषी बाबा उरुसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास महाराष्ट्रातून पैलवानांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये पैलवानावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.अनेक मातब्बर पैलवानांनी सहभाग नोंदविल्या मुळे असंख्य दर्शक उपस्थित होते. अंतिम फेरीत गुणवंत व्यायाम शाळेचे रामनगर येथील पैलवान बाबासाहेब चव्हाण आणि जालना येथील जगदीश परदेशी यांच्या दरम्यान रंगलीदोन्ही पैलवान सारखे असल्यामुळे निकाल लागला नाही, तसेच दोघांना अर्धे-अर्धे पारितोषिकावर समाधान करावे लागले
स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सरपंच गणपत गवळी, हरिभाऊ गवळी, अंकुश पैलवान साबळे सुभाष जंजाळ इत्यादींनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पंधरा हजार ठेवण्यात आले होते. तर प्रत्येक सामन्याला वेगळे बक्षीस देण्यात आले होते. यावेळी जालना येथील गुणवंत व्यायाम शाळे चे पैलवान गजानन यज्ञेकर यांचा खास सत्कार करण्यात आला. तर स्पर्धेसाठी पंचाची भूमिका हरिभाऊ गवळी यांनी केली.