छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मलेशिया येथे दिनांक 12 ते 15 ऑक्टोबर 2017 या कालावधीत आंतर राष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीज आयोजित केली आहे, आंतर राष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीज करिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव विकास सूर्यवंशी यांची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली.विकास सूर्यवंशी यांनी नुकतीच NIS (डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग) हि पदवी प्राप्त केली असून हे राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.
विकास सूर्यवंशी यांची भारतीय खो खो संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा उदयोजक समीर मुळे, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस ऍड.गोविंद शर्मा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, कोषाध्यक्ष श्रीपाद लोहकरे, सदस्य विनायक राऊत, आशिष कान्हेड, मनोज गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.