पुणे | करोना नंतर अशा प्रकारच्या राज्य किंवा राष्ट्रीय स्पर्धांची आतूरतेने वाट कोण पहात असले तर ते हे समोर बसलेले खेळाडू. केव्हा एकदा मैदानावर जाऊन पुन्हा आपल्या खेळाची चुणूक दाखवू असे या खेळाडूंच्या मनात वाटत असेल, असे महाराष्ट्र विधान सभेचे मुख्य प्रवक्ते आमदार आशिष शेलार यांनी आपले मत व्यक्त केले. महाराष्टÑ ज्यूदो असोसिएशनच्यावतीने महाराष्टÑीय मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शेलार म्हणाले, करोना नंतरच्या सुमारे दिड ते दोन वर्षाच्या काळानंतर अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन व्हावे याची सर्वांत जास्त वाट जर कोण पहात असेल तर ते समोर बसलेले सर्व खेळाडू पहात होते. या काळा या खेळाडूंनी आपल्या खेळाचा सराव करून जी तंदूरूस्ती, खेळातील तंत्रात सुधारणा केली ती या स्पर्धेच्या माध्यमातून उपयोगात आणण्यासाठी व जिल्हा, राज्य व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे व देशाचे नावालौकिक करण्यासाठी हे खेळाडू आतूर आहेत.
त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. आमदार मुक्ताताई या महाराष्ट्रतील आमच्या सर्वांत लाडक्या व लोकप्रिय आणि आम्हाला आवडणाºया नंबर एकच्या आमदार आहेत. याच कारण सुध्दा तसे आहे, मुक्ताताई या सदैव हसत असतात. आज सुध्दा प्रकृतीच्या या परिस्थितीमध्ये सुध्दा आपल्यापेक्षा जास्त हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यांचा नगरसेवक ते महापौर, पालिकेतील महत्वाची पदे भोगल्यानंतर आणि सध्या आमदार हा त्यांचा सर्व प्रवास जर आपण पाहिला तर त्या अजून सुध्दा जमीनीवर चालणाºया नेत्या आहेत, आणि म्हणून त्या आमच्या आवडत्या आहेत.
स्पर्धेच्या संयोजिका आमदार मुक्ता टिळक म्हणाल्या, या स्पर्धेत सहभागी होऊन पदके जिंकलेल्या खेळाडूंनी राष्टÑीय स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदके जिंकावीत आणि आपल्या राज्याचे नावलौकीक करावे. खेळाडूंना सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न माझा नेहमी असतो. शालेयस्तरापासून मुला-मुलींनी मैदानावर येऊन खेळ खेळावेत. शिक्षण प्रसारक मंडळी व महाराष्ट्रीय मंडळाचे सुध्दा त्यांना आभार मानले.
शहर भाजपा अध्यक्ष जगदिश मुळीक यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्टÑ ज्यूदो असोसिएशनच्यावतीने खास तयार करण्यात आलेले मानपत्र आमदार मुक्ता टिळक यांना अॅड धनंजय भोसले व शैलेश टिळक यांनी प्रदान केले.
महाराष्टÑ ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष अॅड धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपाचे श्रीपाद ढेकणे, धीरज घाटे, दत्ता खाडे, कुणाल टिळक,,माजी आॅलिम्पिकयन व अर्जुन पुरस्कार विजेते कावस बिलिमोरीया, ज्यूदो महासंघाचे माजी सचिव मुश्ताक अली, ज्यूदो असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीश बंगेरा, स्पर्धेचे निरीक्षक अनिल सपकाळ, स्पर्धा संचालक दीपक होले, राज्य ज्यूदो असोसिएशनचे सर्व पद्धिकारी, तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे याच्यासह नगरसेवक अजय खेडेकर, अर्चना पाटील, आरती कोंढरे, दीपक पोटे, विजया लक्ष्मी हरीहर, सम्राट थोरात, गायत्री खडके, राजेश येनपूरे, योगेश समेळ, दत्ता खाडे,भाजपा कसबा मतदार संंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकड, छगन बुलाखे, भाजपा कसबा मतदार संंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी पांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित कंक उपस्थित होते.
भाजपा कसबा मतदार संंघाचे चिटणीस राजेंद्र काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सरचिटणीस अॅड. राणीताई कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.