थलायवासचा पराभव करत ;पाटणा पायरेट्सने रचला इतिहास

प्रो कबड्डी लीगच्या ८०व्या सामन्यात, पाटणा पायरेट्सने तामिळ थलायवासचा एकतर्फी सामन्यात ५२-२४ असा पराभव केला आहे. पाटणाने १२ सामन्यांमध्‍ये आठव्या विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. तामिळ थलायवासचा १३ सामन्यांमधला हा चौथा पराभव असून ते १०व्या स्थानावर आहेत. पाटणाच्या बचावफळीने शानदार खेळ केला आणि तीन खेळाडूंनी हाय ५ पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पाटणा पायरेट्सने डिफेन्समध्ये विक्रमी २१ गुण मिळवत इतिहास रचला आहे.

सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली होती आणि दोन्ही संघांनी सावधपणे खेळण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या १० मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी आठ गुण होते. दोन्ही संघांच्या डिफेन्सला प्रत्येकी तीन टॅकल पॉइंट मिळाले आणि चढाईतही दोघांना प्रत्येकी समान चार गुण मिळाले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक अतिरिक्त गुण मिळाला. मोनू गोयतने सर्वाधिक तीन रेड पॉइंट घेतले.

 

 

तर १३व्या मिनिटाला थलायवास ऑल आऊट झाल्यानंतर पटनाने सात गुणांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मिळाल्यानंतर पाटणाने मागे वळून पाहिले नाही आणि पहिल्या हाफ टाईमपर्यंत नऊ गुणांची आघाडी घेतली होती. प्रशांत कुमार रायने पटनाला चार गुणांसह मोठी आघाडी मिळवून दिली. सागरने थलायवाससाठी तीन टॅकल पॉइंट घेतले आणि तो संघाचा सर्वात यशस्वी बचावपटू ठरला.

 

पाटणा पायरेट्सने त्यांचा शेवटचा सामना १८ जानेवारी रोजी खेळला होता. त्यानंतर १० दिवसांनी शानदार विजयासह स्पर्धेत पुनरागमन केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

You might also like

Comments are closed.