औरंगाबाद (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य बाँक्सिंग संघटनेच्या वतीने महाड (रायगड) येथे नुकताच झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत टाकस् बॉक्सिंग अकादमीच्या मुकेश आसेकरने सुवर्णपदक पटकावले. त्याने ५८ ते ६१ किलो वजन गटामध्ये पहिल्या फेरीला क्रीडा प्रबोधिनीच्या, दुसऱ्या फेरीत पुणे शहर आणि अंतिम फेरीमध्ये पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंना हरवत सुवर्ण आपल्या नावे केलं. मुकेश विभागीय क्रीडा संकुल येथे प्रशिक्षक राहुल टाक यांच्या मार्गर्शनाखाली नियमित सराव करतो.
त्यांच्या यशाबदल क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी , उपाध्यक्ष डॉ. केजल भट, सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिंदन केले.