महिला कुस्तीपटुंच्या दिरंगाईबाबत सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांवर ताशेरे

बृजभूषण सिंह यांच्यावर दाखल होणार एफ.आय.आर

सध्या काही भारतीय कुस्तीपटू दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामूहिक उपोषणास बसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यासंबंधी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली असतानाही, एफआयआर नोंद केली नव्हती. एफआयआर दाखल करून घेण्यासाठी सहा दिवसांचा विलंब झाल्यानंतर आता थेट सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करत, दिल्ली पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी (28 एप्रिल) या प्रकरणावर सुनावणी पार पडली. खेळाडूंच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ कपिल सिबल यांनी बाजू मांडली. बृजभूषण यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे नोंद असल्याने खेळाडूंना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याबाबत दिल्ली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, आरोप करणाऱ्या अल्पवयीन खेळाडूंना संरक्षण देण्यास सांगितले. तसेच, पुढील आठवडाभरात काय घडले याबाबतचा अहवाल आपण घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनाचे नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक व राष्ट्रकुल विजेते विनेश फोगट हे करत आहेत. तब्बल नऊ मुलींचे सिंग यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच सिंग हे मनमानी कारभार करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. जानेवारी महिन्यात याच कुस्तीपटूंनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन केले होते.

          ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा 

खेळाडू म्हणून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही दररोज कठोर प्रशिक्षण घेतो. भारतीय कुस्ती प्रशासनावर झालेल्या छळाच्या आरोपांबाबत आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक असल्याचे पाहणे अत्यंत चिंतेचे आहे. माझे हृदय प्रभावित झालेल्या सर्वांसाठी जाते. आम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की हा मुद्दा योग्य रीतीने हाताळला जाईल, अॅथलीट्सच्या चिंता ऐकल्या जातील आणि निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे हाताळल्या जातील. ही घटना छळ रोखू शकणार्‍या आणि पीडितांना न्याय मिळवून देणार्‍या योग्य संरक्षण यंत्रणेची महत्त्वाची गरज अधोरेखित करते. सर्व खेळाडूंना भरभराट होण्यासाठी सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने आपण काम केले पाहिजे.

सध्या देशामध्ये या खेळाडूंना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर खेळाडूंना न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होतायेत. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारे अभिनव बिंद्रा व ‌‌‌‌‌‌‌नीरज चोप्रा यांनी या खेळाडूंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.

 

ब्रिजभूषण शरण सिंग, अध्यक्ष, भारतीय कुस्ती महासंघ (WFI)

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला त्याचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. तपासात माझ्या सहकार्याची आवश्यकता असेल तेथे मी सहकार्य करेन: ब्रिजभूषण शरण सिंग

You might also like

Comments are closed.