औरंगाबाद-सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा 12 सप्टेंबर, रविवार रोजी औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी बजावलेले, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटू या स्पर्धेत सहभाग घेणार असून सायकलींग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्हा (एकमेव मान्यताप्राप्त संघटना) व औरंगाबाद चे माजी सायकल पटू तसेच सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा चे खजिनदार भिकन अंबे यांच्या विद्यमाने अशा स्पर्धा प्रथमच औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकल पटूनी सहभाग घ्यावा, व औरंगाबाद जिल्ह्यातील सायकल प्रेमींनी व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्ह्याच्या सचिव पूजा अंबे यांनी केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन, साई पूजा स्पोर्ट्स, सायकलिस्ट फाउंडेशन औरंगाबाद, आयनमॅन डॉ. प्रफुल जटाळे, रवींद्र आवारे, डॉ. विजय व्यवहारे, अभय देशमुख, सोनाली अंबे, निखिल पवार, गणेश बनसोडे, आदी कार्यरत आहेत.