औरंगाबाद(प्रतिनिधी) नुकत्याच जळगाव या ठिकाणी झालेल्या २७ वी राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये जूनियर आणि सीनियर या वयोगटात पार पडल्या या स्पर्धेमध्ये औरंगाबाद मधील खेळाडूंनी स्पर्धेमध्ये तब्बल १६ सुवर्ण ०४ रौप्य व ०३ कास्य पदक यांची कमाई केली त्या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटात सांघिक रोप्य पदक पटकावले. तसेच ज्युनियर गटाने सांघिक विजेतेपद पटकावले या सर्व खेळाडूंना प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ.मकरंद जोशी तसेच औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी अध्यक्ष डॉ.आदित्य जोशी उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे कोषाध्यक्ष सागर कुलकर्णी डॉक्टर विशाल देशपांडे रोहित रोंगे संदीप गायकवाड राहुल तांदळे तनुजा गाढवे आदींनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
संघ खालीलप्रमाणे:-
वरिष्ठ गट
१)मिश्र दुहेरी- सुवर्ण
शुभम सरकटे
निधी धर्माधिकारी
२) पुरुष दुहेरी- सुवर्ण*
निखिल पाटील
विश्वजीत शेजुळ
३) महिला ग्रुप:- कास्य
नुपूर लाडवणी
रीची देव
श्वेता देव
जुनिअर गट
१)मिश्र दुहेरी :- सुवर्ण
रिद्धी जैस्वाल
ऋत्विज देव
१)पुरुष दुहेरी:- रौप्य
साहिल माळी
प्रवीण नागरे
पुरुष ग्रुप:- सुवर्ण
क्रांतीकुमार नरवडे
आदित्य सिंग
हर्षल आठवले
अबदान सिद्दिकी