जालना (प्रतिनिधी)-सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत रामनगर येथील गुणवंत व्यायामशाळेच्या सात मल्लांनी विविध वजनी गटात झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या सर्व खालील मल्लांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.
सुवर्णपदक प्राप्त मल्ल सुरेश जोशी यांनी 84 किलो वजनी गटात ,60 किलो वजनी गटात पृथ्वीराज जोशी ,92 किलो वजनी गटातून बाबासाहेब चव्हाण ,84 किलो वजनी गटातून आदित्य कांबळे, 76 किलो वजन गटात शुभम गित्ते, 71 किलो वजन गटात तुन शुभम भद्रे ,47 किलो वजन गटात तुन रितेश घोरपडे.
या सर्व मल्लांना व्यायाम शाळेचे अध्यक्ष पैलवान गजानन यज्ञेकर जोशी, कोच संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या सात सुवर्णपदक विजेते मल्लांचे पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर जोशी, मौजपुरी चे सरपंच भागवत राऊत आदींनी स्वागत केले आहे. गुणवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष पैलवान गजानन यज्ञेकर जोशी बोलताना म्हणाले की, कोरोना काळात शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून वेळोवेळी मल्लाकडून सराव करून घेतला आहे. त्यांना आवश्यक खुराक उपलब्ध करून दिला आहे. या निमित्ताने शासनाच्या क्रीडा विभागाने व्यायामशाळेस आवश्यक असे सहाय्य करून ग्रामीण भागातील मल्लाना प्रोत्साहित करावे अशी मागणी त्यांनी केली.