औरंगाबाद : क्रीडा दिनानिमित्त ,सिद्धिविनायक प्रतिष्ठान,ग्रामपंचायत तिसगाव आणि औरंगाबाद स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी खुल्या गटाच्या फक्त औरंगाबाद शहरासाठी मर्यादित व्हॉलीबॉलचा स्पर्धा घेण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्या संघाला पाच हजार एक रोख रक्कम व करंडक व द्वितीय येणाऱ्या संघाला तीन हजार एक व करंडक देण्यात यणार तसेच स्पर्धेत उत्तम खेळाडू ना उत्कृष्ट अटॅकर व उत्कृष्ट सेटर असे पारितोषिक ठेवण्यात येणार आहे.ए.एस.क्लबजवळ असलेल्या म्हाडा कॉलनीतील सिद्धीविनायक विहारमध्ये ही स्पर्धा होणारआहे तरी जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा .अधिक माहीतीसाठी अभिषेक गणोरकर(७०२०२७०८६९) व लोकेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा. असे आव्हान करण्यात आले आहे.