आज आयपीएल मध्ये सुपर संडे म्हणून दोन सामने आहे यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये गुजरात समोर लखनऊचे आवाहन आहे. सामन्यात लखनऊ ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र गुजरातच्या सलामीवीरांनी लखनऊचा हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. गिल आणि सहाने गुजरातला रेकॉर्ड सलामी करून दिली.
दोघांनी लखनऊच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला आणि धावांचा पाऊस पडला. गिल ने नाबाद 94 तर सहाणे 81 धावा केल्या. तर लखनऊच्या गोलंदाजांना फक्त दोन गडी बात करता आल्या मोहसीन खान आणि आवेश खानने प्रत्येकी एक एक गडी बाद केला. हार्दिक पांड्याने 25 तर मिलरने ही 21 धावांचे योगदान दिले. लखनऊ समोर दुसऱ्या डावात 228 धावांचे विशाल आवाहन आहे.