जालना (प्रतिनिधी)- मंठा तालुक्यातील तळणी येथील पैलवान शुभम रमेश गत्ते याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत जालना जिल्ह्याचे नाव उंच केले आहे. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 82 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले असून त्याचे नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याने केलेल्या यशाबद्दल त्याचे माजीआमदार सुरेश कुमार जेथलिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घारे, भाजपा तालुका उपाध्यक्ष अशोक राठोड, तसेच ग्रामस्थांच्या वतीने तसेच त्याला सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.