जालना (प्रतिनिधी)-भारताचा राष्ट्रीय स्तराचा नेमबाज नमन वीर सिंग ब्रार याचा मृतदेह मोहाली येथील त्याच्या राहत्या घरी. सकाळी आढळला.पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मोहली शहरातील सेक्टर 71 मधील त्याच्या निवासस्थानी त्याचा मृतदेह सापडला. नमन वीर सिंग ब्रार यांच्या कुटुंबीयांना या बातमीने धक्का बसला.नमन वीर ने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे हे कळत नसल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. शवविच्छेदन अहवालात खरा प्रकार समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.
नमन वीर ब्रार याचा मोठा भाऊ डॉक्टर प्रभू सुखमन ब्रार हादेखील नेमबाज आहे. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. तर आई गृहिणी आहे. पंजाबच्या फरीदकोट वरून 2009 मध्ये ब्रार कुटुंब मोहली ला शिफ्ट झाले होते. त्याने 2015 ला दक्षिण कोरिया मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये डबल ट्रॅप प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. ट्रॅप प्रकारातील सांघिक प्रकारात त्याने अंकुल मित्तल आणि असगर हुसेन यांच्यासमवेत ही कामगिरी केली होती. त्याच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.