साक्षी पांडेचे सर्वाधिक ११ गुण; महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघ उपांत्य फेरीत

अहमदाबाद- आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी पांडे, श्रुती मेनन आणि सिया देवधर यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघाने रविवारी 36 व्या नॅशनल गेम्सची उपांत्य फेरी काढली. महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने 20- 19 अशा फरकाने रोमहर्षक विजय संपादन केला. किताबासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरीत तेलंगणा टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

महाराष्ट्र संघाच्या विजयासाठी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू साक्षी पांडे तिने सर्वाधिक ११ गुणांचे योगदान दिले. तसेच श्रुती पाच गुणांचे योगदान देऊन मैदानाबाहेर झाली. दुखापतीमुळे तिला अर्ध्यावर डाव सोडावा लागला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू सिया देवधरने सर्वोत्तम कामगिरी केली. त्यासोबत दुर्गा धर्माधिकारीची खेळी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला शानदार विजय साकारता आला.

 

You might also like

Comments are closed.