पुणे(प्रतिनिधी)- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित सातव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकित सक्षम भन्साळी याने अव्वल मानांकित अहान सारस्वतचा 6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालासह अंतिम फेरीत प्रवेश केला..
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित राम मगदूमने कडवी झुंज देत स्वर्णीम येवलेकरवर टायब्रेकमध्ये 7-6(8-6) असा विजय मिळवला. याच मुलींच्या गटात अव्वल मानांकित ध्रुवा माने हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत चौथ्या मानांकित श्रेया होनकनचे आव्हान 6-0 असे सहज मोडीत काढले. तर, शिबानी गुप्तेने माहिका रेगेचा टायब्रेकमध्ये 7-6(7-5) असा संघर्षापुर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात आरिन कोटणीसने आदिनाथ कचरेचा 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित आरव मुळ्येने हर्ष परिहारचा 6-1असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित ओवी मारणेने पाचव्या मानांकित मायरा शेखचा 6-3 असा पराभव केला. अव्वल मानांकित स्वरा जावळेने सारा फेंगसेला 6-3 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
12 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
सक्षम भन्साळी(4) वि.वि.अहान सारस्वत(1) 6-2;
राम मगदुम(3) वि.वि.स्वर्णीम येवलेकर 7-6(8-6).
12वर्षाखालील मुली:
ध्रुवा माने(1) वि.वि.श्रेया होनकन(4) 6-0;
शिबानी गुप्ते वि.वि.माहिका रेगे 7-6(7-5).
10वर्षाखालील मुले:
आरिन कोटणीस वि.वि.आदिनाथ कचरे 6-1;
आरव मुळ्ये(3) वि.वि.हर्ष परिहार 6-1.
10वर्षाखालील मुली:
स्वरा जावळे(1) वि.वि.सारा फेंगसे 6-3;
ओवी मारणे(2) वि.वि.मायरा शेख(5) 6-3.