पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी 3, सोलारिस गोगेटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात राजेंद्र साठे, सारंग देवी, श्रवण हार्डीकर, सारंग पाबळकर, मिहीर दिवेकर, सारंग देवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी 3संघाने महाराष्ट्र मंडळ 1 संघाचा 20-07 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात सोलारिस गोगेटर्स संघाने फर्ग्युसन कॉलेज क संघाचा 20-14 असा पराभव करून विजय मिळवला. विजयी संघाकडून संजीव घोलप, संदीप आगळे, गिरीश साने, सिद्धार्थ भरमगोंडे, निनाद वाहीकर, सिद्धार्थ जोशी यांनी सुरेख कामगिरी बजावली.
निकाल: साखळी फेरी:
पीवायसी 3 वि.वि.महाराष्ट्र मंडळ 1 20-07(100 अधिक गट:राजेंद्र साठे/सारंग देवी वि.वि.केवल सेठिया/सुनील रायसोनी 6-0; 90 अधिक गट: श्रवण हार्डीकर/सारंग पाबळकर वि.वि.प्रशांत सांघवी/विनोद संचेती 6-0; खुला गट: ध्रुव मेड/हर्षा हळबे पराभूत वि.शितल बलदोटा/पंकज सेठिया 2-6; खुला गट: मिहीर दिवेकर/सारंग देवी वि.वि.विशाल पटेल/सिद्धार्थ शहा 6-1);
सोलारिस गोगेटर्स वि.वि.एफसी क 20-14(100अधिक गट: संजीव घोलप/संदीप आगळे वि.वि.हनुमंत साठे/आनंद पंडितराव 6-1; 90अधिक गट: गिरीश साने/सिद्धार्थ भरमगोंडे वि.वि.आदित्य महागावकर/श्रीवर्धन सुदामे 6-4; खुला गट: निनाद वाहीकर/सिद्धार्थ जोशी वि.वि.जगमोहन विडेकर/मनमीत लांबा 6-3; खुला गट: हेमंत भोसले/संजीव घोलप पराभूत वि.निलेश बंदेवर/हिमांशू ताम्हणकर 2-6).