हॉलंड : टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी झालेल्या १०व्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने ग्रँडमास्टर विदित गुजराथीवर सरशी साधून सलग तीन पराभवांची मालिका संपुष्टात आणली. १६ वर्षीय प्रज्ञानंदने विदितला ७८ चालींपर्यंत लांबलेल्या लढतीत नमवले. त्यामुळे सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणाºया विदितची स्पर्धेतील दुसºया पराभवामुळे आता थेट चौथ्या स्थानी घसरण झालेली आहे.
चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीने अग्रस्थान कायम राखले आहे. अर्जुनने १०व्या फेरीत रशियाच्या पोलिना शुवालोव्हाला बरोबरीत रोखले आहे.