औरंगाबाद(प्रतिनिधी)- भारतीय बास्केटबॉल महासंघ-नियुक्त-ऍडव्होक समिती महाराष्ट्र व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, यांच्यावतीने, चौथ्या खेलो इंडिया निवड चाचणी साठी जुनिअर बास्केटबॉल मुलींची निवड, राज्य जुनिअर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा, व पुरुष व महिला गटांचा राज्याच्या संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन, दिनांक १२ ते १६ डिसेंबर २०२१ तारखेदरम्यान औरंगाबाद, येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेत राज्यातील जवळपास तीस मुलांचे संघ व सव्वीस मुलींचे संघ सहभागी होत असून स्पर्धा साखळी व बाद पद्धतीमध्ये सलग पाच दिवस चालणार आहे.भारतीय बास्केटबॉल महासंघ-नियुक्त-ऍडव्होक समिती महाराष्ट्र, स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, आयोजन समिती संयोजक शिव छत्रपती पुरस्कार विजेते शत्रुघ्न गोखले, सदस्य जयंत देशमुख, डॉ. शरद बनसोडे, आणि शशिकांत नांदगावकर कार्यभार साधणार आहे. तर भारतीय बास्केटबॉल महासंघ-नियुक्त-ऍडव्होक समिती महाराष्ट्र यांनी संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी लोकल असिस्टंट गणेश कड (९२८४०७७७६४) यांच्याकडे सोपवली आहे.स्पर्धेतील सहभागी संघाची नावनोंदणी ,पात्रता फॉर्म आणि नोंदणी शुल्क स्वीकारण्यासाठी डॉ सचिन देशमुख (९८८११९००७०), सपर्क साधावा
जिल्ह्यातील बास्केटबॉल प्रेमी व सर्व सुजाण नागरिकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील नवतरुण व युवा बास्केटबॉल खेळाडू यांचा खेळ जवळून पाहण्याची नामी संधीचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे असे जाहीर आवाहन स्पर्धा आयोजक लोकल असिस्टंट श्री.कड यांनी केलेआहे.