आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून आगामी पॅरिस ऑलम्पिकसाठीचा प्रवेश निश्चित करणे हे मुख्य लक्ष असल्याचे गोलरक्षक पीआर श्रीजेश यांनी सांगितले. ऑलम्पिक प्रवेश निश्चित करण्याबरोबर युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याचे संकेत अनुभवी गोरक्षक श्रीजेश यांनी दिले.
भारतीय हॉकी संघासाठी चालू वर्ष खूप व्यस्त असणार आहे. तरीही भारतीय संघातून अनेक युवा हॉकीपटूंना खेळण्यासाठी ची संधी मिळणार आहे .यावर्षी भारतीय हॉकी संघ आगामी महिन्यात सुरू होणार एफआयएच हॉकी प्रो लिक्स स्पर्धेने आपल्या नवा हंगामाची सुरुवात करणार आहे.
प्रसिद्धिमाध्यमांशी ऑनलाईन संवाद पीआर श्रीजेश साधताना म्हणाला की ,प्रत्येक ऑलम्पिक स्पर्धेनंतर आम्ही पुढील चार वर्षाची योजना आखतो त्यामुळे टोकियो ऑलम्पिक आणि पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी आम्ही योजना बनवणे सुरू केले आहे.पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघात आपल्याला अनेक बदल झालेले दिसून येतील काही प्रमुख खेळाडूंबरोबरच काही युवा हॉकीपटू यात सहभागी होतील, असे श्रीजेशने सांगितले.
श्रीजेश इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट मॅनेजमेंटने पुढाकार घेऊन टोकिया ओलंपिक स्पर्धेतील पदक विजेते 18 खेळाडूंना घेऊन राष्ट्रगीताचा एक व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ सोमवारी प्रकाशित करण्यात आला आहे.पॅरिस ऑलिंपिक सुरू होण्याचा आता फक्त दोन वर्षाचा कालावधी राहिलेला आहे .त्यामुळे भारतीय हॉकी संघातील व हॉकीपटूंना संधी देणे संघासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकते, असे श्रीजेश याने सांगितले आहे .
भारतीय हॉकी संघात युवा खेळाडूंना थेट प्रवेश दिला जाईल असे मी म्हटलेले नाही. त्यांना कोर ग्रुपमध्ये स्थान देण्यासाठी अधिक संधी मिळेल एवढेच माझे म्हणणे आहे. असेही त्याने नमूद केले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ जवळपास सोळा सामने खेळण्याची शक्यता आहे ,तसेच आशाही करंडक हॉकी स्पर्धेही होण्याची चिन्हे आहेत. या स्पर्धेत दिवा हॉकीपटूंना संधी देऊन त्यांचे कौशल्य आजमावले जाऊ शकते .युवा हॉकीपटूंना जर संधी द्यायची असेल तर यापेक्षा उत्तम व्यासपीठ कोणती असू शकते कारण त्यांना अनुभवी खेळाडूंसोबत अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकेल याकडे श्रीजेश यांनी लक्ष वेधले.
आम्ही नवीन डावपेच आखले आहेत आणि त्यानुसार सराव करीत आहोत. विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत विषयी आत्ताच भाकीत करणे घाईचे होईल कारण आमचे सध्या लक्ष फक्त आशियाई क्रीडा स्पर्धेत वर आहे. विश्व करंडक हॉकी स्पर्धेत आघाडीच्या चार देशांमध्ये स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे देखील श्रीजेश याने सांगितले.