• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: पंजाब-उत्तर प्रदेश संघात रंगणार अंतिम लढत

by pravin
December 21, 2021
in हॉकी, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे- बलाढ्य पंजाब आणि उत्तर प्रदेश यांच्यात ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. येथील नेहरुनगर मधील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या आजच्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशाने हॉकी कर्नाटकाचा २-१ आणि पंजाबने यजमान हॉकी महाराष्ट्राचा ३-० असा पराभव केला.

पाच वेळा अंतिम लढत खेळणाऱ्या पंजाबविरुद्ध महाराष्ट्राची सुरवात सनसनाटी होती. त्यांनी कमालीचा वेगवान खेळ करताना सुरवातीलाचा तीन पेनल्टी कॉर्नर मिळविले. मात्र, त्यांना ते साधता आले नाहीत. पंजाबचा गोलरक्षक कमलबीर सिंग याने शिताफीने महाराष्ट्राचे तीनही प्रयत्न फोल ठरवले.

दुसरीकडे पंजाबने नंतर खेळावर नियंत्रण मिळवले आणि दोन कॉर्नर मिळवले. त्या वेळी एकेकाळी संघ सहकारी असलेला गोलरक्षक आकाश चिकटे रुपिंदरच्या शॉटचा अंदाज घेऊ शकला नाही. सामन्याच्या २८व्या मिनिटाला रुपिंदरने कॉर्नर सत्कारणी लावताना पंजाबला आघाडी मिळवून दिली. अर्थात, महाराष्ट्रानेही बचाव भक्कम राखला होता. त्यामुळे मध्यंतराला पंजाबला १-० अशाच आघाडीवर समाधान मानावे लागले.

उत्तरार्धात सुरवातीलाच सुदर्शन सिंग याने ३९व्या मिनिटाला गोलपोस्टचे अचूक लक्ष्य साधत पंजाबला २-० असे आघाडीवर नेले. सात मिनिटांनी मिळालेला कॉर्नर रुपिंदरने पुन्हा एकदा सत्कराणी लावला आणि पंजाबची बाजू भक्कम केली. हीच आघाडी कायम ठेवताना पंजाबाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली.

त्यापूर्वी, दोन माजी उपविजेत्या संघातील लढतीत उत्तर प्रदेशाने बाजी मारली. पहिल्या पाच मिनिटांत उत्तर प्रदेशाचा दबदबा होता. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला महंमद अमिर खानने अगदी जवळन कर्नाटकाच्या गोलरक्षक सोमण्णा शरथ के.पी.ला चकवले. त्यानंतर आठव्याच मिनिटाला विशाल सिंगने आणखी एक गोल करत कर्नाटकाला स्थिरावण्यापूर्वीच दडपणाखाली आणले. त्यानंतर कर्नाटकानेही हर तऱ्हेने प्रयत्न केले. पण, त्यांना गोल करण्याच्या संधी साधता आल्या नाहीत. सामन्याच्या २२व्या मिनिटाला महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, यानंतरही कर्नाटकाला बरोबरी साधण्यात अपयश आले. त्यामुळे विश्रांतीला २-१ अशा आघाडीवरच सामना थांबला होता. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून कमी अधिक प्रमाणात गोल करण्याचे प्रयत्न झाले मात्र, कुणालाही यश आले नाही. मध्यंतराचीच आघाडी राखत उत्तर प्रदेशाने विजय साकार केला.

आम्ही स्पर्धेत सहभागी झाल्यावर एका वेळेस एकाच सामन्याचा विचार केला. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आम्हाला हेच सातत्य अंतिम सामन्यापर्यंत राखायचे आहे. आमच्या विजयात गोलरक्षक आयुष द्विवेदी याचा महत्वाचा वाटा होताी. त्याच्या अभेद्य गोलरक्षणाने आमचा आत्मविश्वास उंचावला, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशाचा कर्णधार विवेकने व्यक्त केली. आम्हाला पुणे दौऱ्याची अखेर सुवर्णपदकाने करायची आहे. उत्तर प्रदेशाच्या वाटचालीत त्याचीच कमतरता आहे, असेही तो म्हणाला.

निकाल –
– हॉकी उत्तर प्रदेश (महंमद अमीर खान ४थे, विशाल सिंग ८वे मिनिट) वि.वि. हॉकी कर्नाटक १ (महंमद राहिल २२वे मिनिट) मध्यंतर २-१
– हॉकी पंजाब २ (रुपिंदर पाल सिंग २८वे, ४६वे मिनिट, सुदर्शन सिंग ३९वे मिनिट) वि.वि. हॉकी महाराष्ट्र ० मध्यंतर १-०

ShareTweetSend
Next Post

पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.