अहमदाबाद- सैन्य दलातील गुणवंत खेळाडू विपुल घरटे आणि ओंकार मस्के दे उल्लेखनीय कामगिरी करत रोलिंग मध्ये महाराष्ट्र संघाला रौप्य पदकाचा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्राच्या या दोन्ही गुणवंत रोव्हरने रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रात पुरुषांच्या गटातील कॉक्सलेस पेयर प्रकारात दुसऱ्या स्थानी धडक मारली. त्यांनी दोन हजार मीटरचे अंतर सहा मिनिट 42 सेकंदात पूर्ण केले. याज महाराष्ट्राचेही खेळाडू रौप्य पदकाचे मानकरी ठरले.
या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राला रोइंग मध्ये पदकाचे खाते उघडून दिले. याच कामगिरीला उजाळा देत नाशिकच्या एशियन चॅम्पियन रोव्हर मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी स्कलमध्ये पदक निश्चित केले. तिने या गटाची फायनल गाठली आहे.
दर्यापूर जिल्ह्यातील विपुल आणि नगर जिल्ह्यातील ओंकार यांनी पुरुषांच्या कॉक्सलेस पेयर गटाच्या फायनल मध्ये सुवर्णपदकासाठी मोठी झुंज दिली. अवघ्या १२ सेकंदाच्या पिछाडीने त्यांचे सुवर्णपदक हुकले. मात्र पदार्पणात या जोडीने रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या गटामध्ये मध्यप्रदेश संघाने कांस्यपदक आणि सर्विसेस संघाने सुवर्णपदकाची कामगिरी केली.
पदक जिंकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली. त्यामुळे हे यश संपादन करता आले. काही सेकंदाच्या फरकाने आम्हाला सुवर्णपदक जिंकता आले नाही. मात्र आगामी काळात कामगिरीचा दर्जा उंचावत चॅम्पियन होण्याचा बहुमान निश्चितपणे मिळू असा विश्वास रोपे पदक विजेत्या विपुल आणि ओंकार यांनी व्यक्त केला
मृण्मयीला सुवर्णसंधी:
2019 एशियन चॅम्पियनशिप मधील सुवर्णपदक विजेत्या मृण्मयी साळगावकरने महिलांच्या एकेरी सकल गटात फायनल गाठली आहे. आता तिला सोनेरी या संपादन करण्याची मोठी संधी आहे. तिने उपांत्य फेरीच्या हिट मध्ये दोन हजार मीटरचे अंतर ७ मिनिट ५४ सेकंदात गाठले. यासह तिने आता सुवर्णपदकाचा दावा मजबूत केला आहे.
पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी: प्रशिक्षक तांबे
महाराष्ट्र संघातील विपुल आणि ओंकार यांनी पदक जिंकण्यासाठी दिलेली झुंज कौतुकास्पद आहे. त्यांनी महाराष्ट्र संघाला पदक जिंकून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यामुळे महाराष्ट्र संघाला हा बहुमान मिळाला आहे. त्यांचे हे पदक आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे संघातील इतर खेळाडूंनाही पदक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक अंबादास तांबे यांनी बदक विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
युवांची कामगिरी लक्षवेधी: प्रदीप गंधे(ध्यानचंद पुरस्कारार्थी, पथक प्रमुख – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन)
रोइंग या खेळ प्रकारात नॅशनल गेम्स मध्ये पदक जिंकणाऱ्या युवा खेळाडूंची कामगिरी खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरत आहे. प्रचंड मेहनतीच्या बळावर या खेळाडूंनी पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भविष्यात महाराष्ट्राला ऑलम्पिक सारखे गुणवंत खेळाडू निश्चितपणे मिळतील, अशा शब्दात महाराष्ट्र संघाचे पथक प्रमुख प्रदीप गंधे यांनी खेळाडूंचे खास कौतुक केले.