अहमदाबाद- सैन्य दलातील रोव्हर विपुल घरटे आणि ओंकार मस्के यांनी सर्वोत्तम कामगिरी करत 36 व्या राष्ट्रीय स्पर्धे ची फायनल गाठली. यास त्यांनी महाराष्ट्र रोईंग संघाचे पदक निश्चित केले. महाराष्ट्राच्या संघाने कॉकलेस पेयर्स गटात हे घवघवीत हे संपादन केले. महाराष्ट्र संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान गाठले. विपुल आणि ओंकार ने दोन हजार मीटरचे अंतर 6 मिनिट 44.2 सेकंदात गाठले. आता या इव्हेंटची अंतिम फेरी सोमवारी रंगणार आहे.
विपुल, ओंकार ची कामगिरी चमकदार
प्रशिक्षक अंबादास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. यासह महाराष्ट्र संघ अंतिम फेरी गाठू शकला. त्या पाठोपाठ तेलंगणा दिल्ली आणि आंध्रप्रदेश संघाने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
महाराष्ट्राच्या विपुल आणि ओंकार यांनी चांगली सुरुवात करून सर्वोत्तम वेळ नोंदवली. त्यामुळे हिट मध्ये महाराष्ट्र संघाला स्थानावर धडक मारता आली.
सोनेरी यशाची आशा : प्रशिक्षक तांबे
महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू विपुल आणि ओंकार यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. यामुळे आता महाराष्ट्र संघाच्या सोनेरी यशाच्या अशा पल्लवी झाले आहे. यामुळे पदर मनामध्ये महाराष्ट्र संघाला या प्रकारात सर्वोत्तम यश संपादन करता येईल, असा विश्वास प्रशिक्षक अंबादास तांबे यांनी व्यक्त केला