औरंगाबाद (प्रतिनिधी) भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नैतिकता समितीने इंडिया तायक्वांदोच्या हंगामी समितीची जबाबदारी सांभाळत असलेल्या नामदेव शिरगावकर यांचे अधिकार काढून घ्यावेत अशी शिफारस ऑलम्पिक संघटनेकडे केली आहे. तसेच याच महिन्यात झालेल्या नैतिकता समितीच्या बैठकीचा अहवाल आमच्या हाती आला आहे.
त्याचबरोबर इंडिया तायक्वांदोच्या कुठल्याही प्रकारे संघ निवडण्याचा अधिकार नसल्याचा आदेश दिल्याची दखल आयओएने घेतली आहे. तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजू मेहता यांनी इंडिया तायक्वांदो असलेले हंगामी सदस्यत्व काढून घेण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.
नामदेव शिरगावकर महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे ही सचिव असून, एकूणच या सगळ्या कार्यवाही मुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढलेल्या आहेत. या संदर्भात त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मी प्रतिसाद दिला नाही.
तेलंगणा तायक्वांदो संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या याचिकेवर या बैठकीत शंकांचे निरसन करण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने देखील शिरगावकर यांच्यावर हंगामी समितीची जबाबदारी सोपवताना नवी परिपूर्ण कार्यकारणी तयार करण्यास सांगितले होते. तरीही शिरगावकर यांनी या पैकी काही केले नसल्याने या बैठकीत स्पष्ट दिसून आले. त्यावरूनच समितीने भारतीय ऑलम्पिक संघटनेकडे शिरगावकर तायक्वांदो संबंधित सर्व उपक्रमांमधून निलंबित करण्यात, आयओएच्या सर्व पदावरून त्यांना काढून टाकावे असा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी आयओएच्यआ आगामी सर्वसाधारण सभेसमोर आणला जाईल आणि त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
तसेच, खेळाडूंच्या हितासाठी संघटना काहीच काम करत नसल्याचा अनिष दास तालुकदार यांच्या याचिकेवर आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा पल्ली यांनी 15 फेब्रुवारी रोजी तायक्वांदो संघटनेचे अजून राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यता, नसल्यामुळे त्यांना कुठलीही निवड चाचणी किंवा भारतीय संघाची निवड करता येणार नाही, असे आपल्या आदेशात नमूद केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी न्यायाधीश रेखा पल्ली यांनी टेबल टेनिसपटू मनिका बात्रा हिच्या अशाच प्रकारच्या याचिकेवरील सुनावणीत भारतीय टेबल टेनिस संघांना बरखास्त करण्याचा आदेश दिला गेला आहे.
नैतिकता समितीची बैठक 8 फेब्रुवारी रोजी समितीचे कार्याध्यक्ष निवृत्त न्यायाधीश व्हीं. के. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच बैठकीस समितीचे सदस्य उमाकांत उनियाल , अनिल खन्ना, सुधांशू मित्तल, डॉक्टर श्रीमती सुदर्शन पाठक, शिवा केशवन, तक्रार करणारे के. श्रीहरी, त्यांचे वकील साबिक, तेलंगणा. तायक्वांदो संघटनेचे श्रीनिवास, आयओएचे वकील हेमंत फलाफेल उपस्थित होते.
औरंगाबाद मध्ये स्पर्धेचे भविष्य पाहूयात-
दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान इंडिया तायक्वांदो वकील ऋषिकेश बरुआ यांनी औरंगाबाद येथे होणारी स्पर्धा कुठल्याही प्रकारे निवड चाचणी च्या उद्देशाने आयोजित केली जाणार नाही असे आमच्या संकेत स्थळावर स्पष्ट केले जाईल असे मान्य केले. असी सूचना अधिकृत संकेत स्थळ आणि सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करावे असेही न्यायाधीश पल्ली यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
त्याचबरोबर जागतिक तायक्वांदो मान्यतेसाठी या नव्या संघटनेच्या हंगामी समितीचे काम करताना त्यांच्या नोंदणीची सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. तरी या संदर्भात काहीच कार्यवाही झाली नाही. उलट्या संदर्भात स्मरण करणारे 9 जानेवारी 20,31 जानेवारी 20 आणि 7 मार्च 20 अशा तीन दिवशी पाठवण्यात आलेल्या ईमेलला देखील शिरगावकर यांनी उत्तर दिले नसल्याचे त्यांनी या पत्रात आठवण करून दिली आहे. हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकक्षेत बसत नाही असे देखील मेहता यांनी पुढे म्हटले आहे. इंडिया तायक्वांदो ही नवी संघटना अस्तित्वात येण्यासाठी काही काम करण्यात आता तायक्वांदो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कुठलेच कामही करण्यात आलेले नाही हे असेच चालू राहिले तर इंडिया तायक्वांदो अटी आणि शर्ती नुसार देण्यात आलेली तात्पुरती मान्यता काढून घेतली जाईल असा स्पष्ट इशारा ही मेहता यांनी पत्राच्या अखेरीस दिली आहे. विशेष म्हणजे या पत्राची एक प्रत आयओएच्या वतीने क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकरणाला देखील पाठवली आहे.
स्पोर्ट्स पॅनोरमाशी वर्षा शिंदे महाराष्ट्र कयाकिंग आणि कायकिंग उपाध्यक्ष बोलतांना म्हणल्या की नामदेव शिरगावकर हे संघटना हायजैक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाबत महाराष्ट्र आलॅम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आतातरी संघटनेच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या गांभीर्याने घ्याव्यात, अशी अपेक्षा आहे.