माझी तुलना हार्दिक पंड्यासोबत? नक्की वाचा ;शार्दुल ठाकुरचे मत

मुंबई –गोलंदाजी असो की फलंदाजी शार्दुलने चांगली कामगिरी करत अष्टपैलू असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीनं शार्दुल ठाकुरनं भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुलने आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे शार्दुल ठाकुर आताच्या घडीला भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि तीन टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली असून अहमदाबादला पोहोचला आहे. शार्दुल ठाकुर स्वत: अष्टपैलू खेळाडू असल्याचं मान्य करतो. तसेच हार्दिक पंड्यासोबत कोणतीच स्पर्धा नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. शार्दुल ठाकुरने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतील आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.
जेव्हा- जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी स्वत:ला सिद्ध करू इच्छितो. मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर धावा करणं, मोठी भागीदारी करणं आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देणं महत्त्वाचं असतं. यामुळे खूप फरक पडतो”, असं शार्दुल ठाकुरने सांगितलं. यावेळी शार्दुल ठाकुरला हार्दिक पंड्यासोबत तुलना होते का? असा प्रश्न विचारला. त्यावर शार्दुल ठाकुरने आपल्या शैलीत उत्तर दिलं. “माझी हार्दिकसोबत कोणतीच स्पर्धा नाही. हार्दिक तंदुरूस्त होऊन संघात लवकरच परतेल. आमच्या दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. हार्दिक पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येतो. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. मी जिथपर्यंत हार्दिकला ओळखतो त्याने मला पाठिंबाच दिला आहे. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो. मी पण तसंच करतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू असणं संघासाठी चांगलं असतं.
फलंदाजी करणं मला आवडतं. पण मला फलंदाजी करण्याची तितकी संधी मिळाली नाही. खासकरून रणजी ट्रॉफीत. जेव्हा मला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली केली. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी मला सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. मी नेटमध्ये फलंदाजीचा सरावही करतो. संघात तळाच्या फलंदाजांचं योगदान महत्त्वपूर्ण असतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने ही रणनिती वापरत वर्षानुवर्ष चांगली कामगिरी केली आहे
Comments are closed.