‘एमआयटी, ‘ बांधकाम व वैद्यकीय संघ विजय;

शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा;

  1. औरंगाबाद-  शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (२० फेब्रुवारी ) खेळविण्यात आलेल्या साखळी सामन्यात एमआयटी हॉस्पिटल संघाने बलाढ्य ‘जिल्हा वकील अ’ संघावर तीन गडी राखून विजयी मिळविला. दुसऱ्या सामन्यात ‘बांधकाम विभाग ब’ संघाने कास्मो फिल्म संघावर १३० धावांनी एकतर्फी विजयी मिळविला. तिसऱ्या सामन्यात ‘वैद्यकीय प्रतिनिधी क’ संघाने महसूल व वन विभाग संघावर १४ धावांनी मात केली. या तिन्ही सामन्यांत क्षितिज चव्हाण, राजेश ढोरमारे आणि अल्ताफ शेख सामनावीर राहिले.

पहिला सामना ‘जिल्हा वकील अ’ व एमआयटी हॉस्पिटल या संघादरम्यान खेळविण्यात आला. एमआयटी हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

 वकील अ संघाने निर्धारित २० षटकांत चार बाद १८७ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये संतोष भारती व कर्णधार मोहित घाणेकर यांनी केवळ ८४ चेंडूत १३५ धावांची भागीदारी केली. संतोष भारती याने अप्रतिम खेळी करताना केवळ ६६ चेंडूत १३ चौकार व एक षटकारासह नाबाद ९२ धावा ठोकल्या. कर्णधार मोहित घाणेकर याने ३५ चेंडूत १० चौकारांसह ५७ धावा, तर मुकूल जाजू याने ११ चेंडूत २ चौकार व एक षटकारासह १७ धावांचे योगदान दिले. एमआयटी हॉस्पिटल संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार साई दहाळे याने ४१ धावांत दोन गडी, तर रत्नाकर देवांग याने ३३ धावांत दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआयटी हॉस्पिटल संघाने उतरला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा ठरला. एमआयटी हॉस्पिटल संघाने १८७ धावांचे लक्ष्य ७ गडी गमावून विजय खेचून आणला. एमआयटी हॉस्पिटल संघाकडून रत्नाकर देवांग, सूर्यकांत कोहळे, रोहन शहा यांनी विजय मिळवून दिला. ‘जिल्हा वकील अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना संतोष भारती याने ३५ धावांत दोन गडी, दिनकर काळे याने २० धावांत दोन गडी, तर बलराज कुलकर्णी, जगदीश घनवट व कर्णधार मोहित घाणेकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दुसरा सामना ‘बांधकाम विभाग ब’ व व कास्मो फिल्म या संघादरम्यान खेळविण्यात आला. ‘बांधकाम विभाग ब’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी राजेश ढोरमारे, अर्षद खान, शेख सिद्दिकी, कर्णधार योगीराज चव्हाण यांच्या खेळीने, तर अनिल आव्हाड यांच्या उत्कृष्ट खेळीने २० षटकांत ५ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. कास्मो फिल्म या संघातर्फे गोलंदाजी करताना प्रितेश चार्ल्स, रोहन इंडिबाग व विराज चितळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, तर उर्वरित फलंदाज धावचित झाले. प्रत्युत्तरात कास्मो फिल्म संघ हा १५ षटकांत सर्वबाद ८० धावाच करू शकला. यात जय हरदे, विराज चितळे, राजेश पवार, संदीप भंडारी यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. ‘बांधकाम विभाग ब’ संघातर्फे गोलंदाजी करताना शेख सिद्दीकी याने केवळ आठ धावांत चार गडी बाद केले, तर सय्यद असद अली याने २२ धावांत तीन गडी, अर्षद खान याने ३२ धावांत दोन गडी, तर एक फलंदाज धावचीत झाला. ‘बाधकाम विभाग अ’ संघाने हा सामना १३० धावांनी जिकं

तिसरा सामना महसूल आणि वन विभाग व ‘वैद्यकीय प्रतिनिधी क’ या संघांदरम्यान खेळविण्यात आला. वैद्यकीय प्रतिनिधी क’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत च बाद १४८ धावा केल्या. यात अल्ता शेख, फैसल पटेल, अब्दुल सामी य उत्कृष्ट खेळी केली. प्रत्युत्तरात मह आणि वन विभाग संघ १९ षट सर्वबाद १३४ धावाच करू शक वैद्यकीय प्रतिनिधी संघाने हा स १४ धावांनी जिंकला.

You might also like

Comments are closed.