मँचेस्टर सिटी, चेल्सीचे विजय;एफए चषक फुटबॉल स्पर्धा

लंडन -चेल्सीने प्लेमथ संघाला २-१ असे पिछाडीवरून नमवले. प्लेमथसाठी गिलेस्पीने आठव्या मिनिटाला गोल केला.

एफए चषक फुटबॉल स्पर्धेतील चौथ्या फेरीत शनिवारी मध्यरात्री चेल्सी, मँचेस्टर सिटी या संघांनी विजय नोंदवले. चेल्सीने प्लेमथ संघाला २-१ असे पिछाडीवरून नमवले. प्लेमथसाठी गिलेस्पीने आठव्या मिनिटाला गोल केला.

मग सेझर अ‍ॅझपीलीक्वेटा आणि मार्कोस अलोन्सो यांनी अनुक्रमे ४१व्या आणि १०५+१ मिनिटाला गोल करून चेल्सीचा विजय साकारला. अन्य लढतीत मँचेस्टर सिटीने फुलहॅमला ४-१ अशी धूळ चारली. सिटीसाठी रियाद मेहरेझने दोन, तर इकाय गुडुंआन, जॉन स्टोन्सप्रत्येकी एक गोल केला.

You might also like

Comments are closed.