संभाजीनगर(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , संभाजीनगर तसेच महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या सहकार्याने आयोजित तलवारबाजी या खेळाच्या स्पर्धांचे विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर येथे पालकमंत्री नामदार संदीपजी भुमरे यांच्या हस्ते विधिवत शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते आमदार अंबादासजी दानवे , यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दयानंद कांबळे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य तथा राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे , कार्याध्यक्ष प्रकाश काठोळे,मार्गदर्शक अशोक दुधारे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर ,दिनेश वंजारे , राजकुमार सोमवंशी, शेषनारायण लोंढे, स्पर्धाप्रमुख डॉ. भूषण जाधव ,राजू शिंदे,आधी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्प गुच्छ देऊन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आतिशबाजी करून मोठ्या उत्साहात जल्लोष मध्ये उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व जिल्हयातील संघांनी मार्च पास करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी बाजीराव देसाई यानी केले तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य डॉ उदय डोंगरे यांनी तलवारबाजी खेळ व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत भूमिका मांडली.अहमदनगर,संभाजीनगर,भंडारा बुलढाणा ,गोंदिया जालना ,कोल्हापूर लातूर ,नागपूर नांदेड ,पालघर नाशिकपरभणी ,सांगली सातारा उस्मानाबाद मुंबई मुंबई उपनगर, सोलापूर ठाणे, आधी जिल्ह्याचे 92 मुले व 96 मुली खेळाडू, 32 संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, 34 पंच पदाधिकारी सहभागी झाले . सर्व खेळाडूंना संभाजीनगरचा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू शकेर सय्यद याने शपथ दिली.
याप्रसंगी राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंनी मार्च पास चे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संभाजीनगर जिल्हा जम्परोप संघटनेच्या वतीने चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित सर्व खेळाडू विद्यार्थी पालकांचे मन जिंकली.
या उद्घाटन प्रसंगी शहरातील एमजीएम संस्कार विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, सुशीलादेवी हायस्कूल, पी डी जवळकर पब्लिक स्कूल, आधी विविध शाळेतील १२०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ तांदळे यांनी केले तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी मानले.
स्पर्धेचे काही निकाल
फाईल मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत सेमी फायनल मध्ये शाकीर सय्यद संभाजीनगर ने सेमी फायनल मध्ये कोल्हापूरच्या अनिल भाई पती अनिल महिपतीचा 15 -10 ने पराभव करीत अंतिम फेरी प्रवेश केला तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये संभाजीनगरच्या तेजस पाटीलने मुंबईच्या अनिल राठोड चा 15 -7 गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
शाकीर सय्यद व तेजस पाटील या दोन्ही आरोग्याच्या खेळाडूंचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये शाकीर ने तेजस चा १५-१२ गुनाने पराभव करत शाकीर सय्यद ने सुवर्णपदक संपादन केले. फाईल मुलींच्या सेमी फायनल मध्ये वैदेही लोहिया संभाजीनगर कोल्हापूरच्या अंकिता सोलंकीचा 15 6 गुणाने पराभव करीत अंतिम फेरी प्रवेश केला तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये वैभवी इंगळे मुंबई या खेळाडूने कोल्हापूरच्या ज्योती सुतार चा 15 -11 गुनाने पराभव करीत अंतिम फेरीत गाठली.
अंतिम फेरीमध्ये संभाजीनगरच्या वैदेही लोहियाने वैभवी इंगळे हिचा १५ -६ गुणांनी पराभव करीत स्पर्धेमध्ये संभाजीनगर साठी दुसरे सुवर्णपदक संपादन केले. ईपी मुलांच्या वैयक्तिक प्रकारामध्ये सेमी फायनल मध्ये गिरीश जकाते याने संभाजीनगरचा यश वाघचा 15 -11 गुणांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये प्रथम कुमार शिंदे कोल्हापूर याने सौरभ तोमर भंडारा चा १५-११ गुणाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली . अंतिम सामन्यात गिरीश जकाते यांनी प्रथम कुमार शिंदे याचा 15- 12 गुणाने पराभव करीत सुवर्णपदक संपादन केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल तांगडे, दीपक रुईकर, सचिन बोर्डे संतोष अवचार, स्वप्निल शेळके ,महेश तवार ,आकाश आरमाळ ,संजय भुमकर , सागर मगरे, तुषार आहेर, अजय त्रिभुवन, बाजीराव भुतेकर, कैलास वाहुळे ,गोकुळ तांदळे, छाया पानसे ,ज्योती कोकाटे, रूपा शर्मा अमृता भाटी , राहुल धनके. आदी परिश्रम घेत आहे.