कोलकत्ता – भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर (IND vs WI) आजपासून टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहेत. भारत आणि विंडीजचे संघ कोलकात्यात आधीच पोहोचले असून आजच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. या सामन्यात प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? या प्रश्नांची उत्तरे आम्ही देत आहोत.
हा सामना १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर होईल?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषिक वाहिन्यांवर केले जाईल.
सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग Disney+Hotstar अॅपवर पाहता येईल. मात्र यासाठी तुम्हाला या अॅपचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.
दोन्ही संघ-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, कुलदीप यादव.
वेस्ट इंडीजः कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकिल होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, काइल मायर्स, हेडन वॉल्श जूनियर.