मुंबई – हिजाबवरुन कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या वादाचे परिणाम संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहेत. फक्त देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकमधील ७५ हजारांपैकी फक्त आठ उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांत हिजाबचा वाद असल्याचे कर्नाटक सरकारने गुरुवारी सांगितलं असून हा मुद्दा सोडवण्यात येईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला. दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटर मोहम्मद शामीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोहम्मद शामीन म्हणाला की, मला कोणत्याही वादात पडायचं नाही. पण जिथपर्यंत कपड्यांचा आणि संस्कृतीचा प्रश्न आहे तर ते प्रत्येक कुटुंबाला माहिती असतं. ते आपापल्या पद्दतीने सांभाळलं पाहिजे. ही पालकांची जबाबदारी आहे.