गुजरातविरुद्ध दिल्लीच्या संघाने मिळवला मोठ विजय!

प्रो कबड्डी लीगच्या (PKL8) ८१व्या सामन्यात दबंग दिल्लीने गुजरात जायंट्सचा ४१-२२ असा पराभव केला. सलग दोन पराभवानंतर विजय मिळवणाऱ्या दिल्लीने गुणतालिकेत पहिले स्थान राखले आहे. मोसमातील सहाव्या पराभवाचा सामना करणार्‍या गुजरातचा संघ ११व्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात दिल्लीच्या बचावफळीने दमदार कामगिरी केली.

दबंग दिल्लीचे १४ सामन्यांत ४८ गुण आहेत. आज दिल्लीच्या बचावफळीने चमकदार कामगिरी करत विक्रमी १७ गुण घेतले. आता अनुभवी रेडर नवीन कुमार दबंग दिल्लीच्या पुढील सामन्यात पुनरागमन करणार आहे, ज्यामुळे संघाला अधिक बळ मिळेल.

 

पूर्वार्धानंतर सामन्याचा गुणफलक २२-११ असा होता आणि दबंग दिल्लीकडे ११ गुणांची मोठी आघाडी होती. दबंग दिल्लीने ११व्या मिनिटाला गुजरात जायंट्सला ऑलआऊट केले. उत्तरार्धात, कृष्ण धुलने बचावात हाय ५ पूर्ण केले. यंदाच्या मोसमात दबंग दिल्लीसाठी अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

यानंतर मनजीत चिल्लरनेही चमकदार कामगिरी करत हाय ५ पूर्ण केले. दोघांना सामन्यात प्रत्येकी ५ टॅकल पॉइंट मिळाले. विजयने चढाईत सर्वाधिक ८ गुण घेतले. याशिवाय बदली खेळाडू म्हणून आलेल्या नीरज नरवालनेही शेवटच्या १५ मिनिटांत ४ रेड पॉइंट घेतले. गुजरात जायंट्ससाठी, केवळ परदीपला या सामन्यात छाप पाडता आली आणि त्याने ७ रेड पॉइंट घेतले. गुजरात जायंट्सने ९ दिवसांनंतर स्पर्धेत पुनरागमन केले, पण त्यांना एकतर्फी पराभवाचे तोंड पाहावे लागले.

You might also like

Comments are closed.