औरंगाबाद(प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी व जपरोप स्पर्धेमध्ये एमजीएम संस्कार विद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करून 5 पदक संपादन केली.रायपूर (छत्तीसगढ)येथे पार पडलेल्या 23व्या सब जूनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कडून प्रतिनिधित्व करत यशश्री वंजारे ने रोप्य पदक( दुतीय) तर नरेश वंजारे यांनी *कास्यपदक( तृतीय) संपादन केला. तर आग्रा येथे पार पडलेल्या
8 वी ज्युनियर राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेमध्ये
१८ वर्षांखालील –
1) हर्ष टाकवले – (30 से. वेग वैयक्तिक) सुवर्णा (प्रथम)
२) चैतन्य हरणे-(३ मिनिटे सहनशक्ती वैयक्तिक) कांस्य ( तृतीय)
(सिंगल रोप स्पीड रिले) रोप्य (द्वितीय) पदक संपादन केले.
या यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम, शाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, प्रशासक सुषमा मोहिते , मल्लिका नायर ,शाळेच्या प्राचार्य उषा जाधव स्मिता मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी ,पर्यावेक्षक विशाल भुसारे,क्रीडाशिक्षक शरद पवार, विवेक पाटील आदींनी अभिनंदन केले.