भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराटने अर्धशतक ठोकले. विराट आता विदेशी मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत सचिनला मागे देखील टाकले.
सचिनने विदेशी मैदानावर १४७ सामन्यांत ५०६५ धावा केल्या. सचिनने १२ शतके आणि २४ अर्धशतके होती. त्याची सरासरी ३६.२४ होती. सचिनची विदेशात खेळताना सर्वोच्च धावसंख्या नाबाद १६३ होती. कोहलीने तेंडुलकरपेक्षा ३९ वनडे कमी खेळले आहेत. विदेशात खेळलेल्या १०८ सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.