म्युलहाइम –जर्मन बॅडमिंटन खुली स्पर्धेमध्ये अव्वल ३०० दर्जाच्या या स्पर्धेद्वारे अनुभवी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉयसुद्धा पुनरागमन करणार आहेत.
दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, जागतिक रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन हे त्रिकुट मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत कोणती कमाल दाखवणार, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अव्वल ३०० दर्जाच्या या स्पर्धेद्वारे अनुभवी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉयसुद्धा पुनरागमन करणार आहेत. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सातव्या मानांकित सिंधूचा थायलंडच्या ११व्या मानांकित बुसाननशी सामना होईल. सायना सिंगापूरच्या जिआ मिनशी दोन हात करेल.
दुहेरीत सात्विक-चिरागवर भिस्त पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्याकडून अपेक्षा आहेत. भारताच्या या तिसऱ्या मानांकित जोडीचा चीनच्या पहिल्या फेरीत ल्यू यू चेन आणि क्वान यी यांच्याशी सामना होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी, तर मिश्र दुहेरीत इशान भटनागर-तनिषा क्रॅस्टो, साई प्रतीक आणि सिक्की रेड्डी या जोडय़ा भारताचे प्रतिनिधित्व करतील.
पुरुष एकेरीत करोनातून सावरलेला आठवा मानांकित श्रीकांत पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझशी मुकाबला करेल. २० वर्षीय लक्ष्य थायलंडच्या केंटाफोन वांगविरुद्धच्या लढतीने अभियानाला प्रारंभ करेल.