नवी मुंबई – कोरिया रिपब्लिक आणि चायना पीआर संघां दरम्यान रविवारी झालेल्या एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेवर पडदा पडला. अर्थात, या रंगतदार लढतीनंतरही स्पर्धा फुटबॉल प्रेमींच्या मनात घर करून राहणार आहे.
स्टिल रोझेसल या नावाने लोकप्रिय असलेल्या स्पर्धेतील विक्रमी नवव्या विजेतेपदाचा आनंद साजरा करत असतानाच, पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉलचे मार्गदर्शन घेणाऱ्या मुली देखिल त्यांच्या कामगिरीने प्रेरित झाल्या आहेत.
महिला फुटबॉलचा विकास आणि विस्तार करण्यासाठी आशियाई फुटबॉल महासंघ कटिबद्ध आहे. याच कटिबद्धतेचा एक भाग म्हणून महासंघाच्या वतीने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत वापरलेले चेंडू क्रीडा प्रबोधिनीत सुरू असलेल्या अकादमीतील मुलींना देण्यात आले. ही अकादमी महाराष्ट्र राज्य युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते. हा संघ सध्या भारतीय महिला लीगच्या पात्रता स्पर्धेत खेळत आहे.
स्पर्धेमध्ये वापरलेले चेंडू महाराष्ट्र सरकारला देण्यात आले असून, ते राज्यभरात वितरित करण्यात येणार आहेत.
अंतिम फेरीच्या लढती दरम्यान मध्यंतराच्या कालावधीत डी. वाय. पाटील मैदानावर हे चेंडू १० युवा मुलींना स्थानिक संयोजन समिती आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या हस्ते वितरित करण्याच आले. या वेळी फिफाचे परिषद सदस्य आणि एएफसी कार्यकारी समिती सदस्य महफुडा अख्तर किरॉन या वेळी उपस्थित होते.
नवी मुंबई, मुबंई, पुणे या तीन यजमान शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यांनंतर ६ फेब्रुवारी रोजी या एएफसी वुमन्स आशियाई कप भारत २०२२ स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.