छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालीय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षे खालील गटात देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवले हा संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.या संघात सम्यक कटारिया, पृथ्वीराज थोटे अदवैद नाबीयार, हर्षवर्धन तांबारे, श्रद्धा वायाळ, सावी अबाड
या संघाच्या घवघवीत यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य माननीय श्री पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, उप प्राचार्य नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने, उपप्राचार्य विजय नलावडे, पर्यवेक्षक किरण पतंगे, आदी देवगिरी परिवाराने खेळाडूचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत यश प्राप्त खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार, डॉ. शेखर शिरसाट, प्रा. शुभम गवळी, प्रा.अमोल पगारे, प्रा. अविनाश वाडे, प्रा. कृष्णा दाभाडे, प्रा. मंगल शिंदे, श्री. शेख शफीक यांचे मार्गदर्शन