नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर वर्षभर झुंज देऊनही रविवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, इरफान पठाण यांनी रैनाच्या वडिलांना आदरांजली वाहिली.
रैनाचे वडिल त्रिलोकचंद (Tirlokchand Raina) हे निवृत्त भारतीय सैन्य अधिकारी होते. जवळपास १ वर्षे कँसरशी झुंज दिल्यानंतर त्यांची जगाचा निरोप घेतला आहे.
आपल्या वडिलांच्या निधनानंतर सोमवारी (०७ फेब्रुवारी) भावुक झालेल्या रैनाने ट्वीटरवर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘वडिलांना गमावल्याचं दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. काल माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्यासंगे माझी सपोर्ट सिस्टिमही मला सोडून गेली आहे. त्याच्यासोबत माझी पूर्ण ताकद गेली आहे. ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवनाशी लढत राहिले. देव तुमच्या आत्म्यास शांती देवो. तुमची पोकळी नेहमीच जाणवेल.अशी भावुक पोस्ट रैनाने केली आहे.
No words can describe the pain of loosing a father. Yesterday, on passing away of my father, I also lost my support system, my pillar of strength. He was a true fighter till his last breath. May you rest in peace Papa. You will forever be missed. pic.twitter.com/9XcrQZeh2r
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) February 7, 2022