सोलापूर(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर थ्रो बॉल असोसिएशन सोलापूर व शरदचंद्र पवार प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय पुणे विभागीय थ्रोबॉल स्पर्धा 14 17 19 वर्षे मुले व मुली स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांच्या शुभहस्ते राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व थ्रोबॉल असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या विभागीय स्पर्धेसाठी अहमदनगर ,पुणे, सोलापूर शहर व जिल्ह्यातील संघ सहभागी झाले. स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष पाटील ,विठ्ठल कुंभार, हर्ष लाहोटी , अनिकेत परदेशी हे काम पाहत आहेत
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष खेंडे,प्रास्ताविक राजाराम शितोळे आभार सचिव मारुती घोडके यांनी केले
अंतिम निकाल
14 वर्षे मुले
- सोलापूर शहर प्रथम
- सोलापूर ग्रामीण द्वितीय
- पुणे ग्रामीण तृतीय
17 वर्षे मुले
- प्रथम पुणे ग्रामीण
- द्वितीय सोलापूर शहर
- तृतीय पुणे शहर
19 वर्षे मुले
- प्रथम पुणे ग्रामीण
- द्वितीय सोलापूर ग्रामीण
- तृतीय पुणे शहर